विदेशी सफरीचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘क्रूझ’ जॉब्स – एक सुवर्णसंधी

विदेशी सफरीचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘क्रूझ’ जॉब्स – एक सुवर्णसंधी

विदेशी सफरीचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘क्रूझ’ जॉब्स – एक सुवर्णसंधी

महाराष्ट्रातील लाखो तरुण-तरुणी परदेशात काम करण्याचं आणि जग फिरण्याचं स्वप्न बघतात. काहींचं स्वप्न असतं युरोप पाहायचं, काहींना अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबईसारख्या देशांमध्ये जाऊन मोठ्या कंपन्यांमध्ये काम करायचं असतं. मात्र, या सर्व स्वप्नांना योग्य दिशा देणारा पर्याय म्हणजे ‘क्रूझ शिप जॉब्स’. जगभरातील समुद्रात फिरणाऱ्या आलिशान क्रूझ जहाजांवर काम करण्याची ही एक अनोखी आणि आकर्षक संधी आहे.

विदेशी सफरीचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘क्रूझ’ जॉब्स – एक सुवर्णसंधी
विदेशी सफरीचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘क्रूझ’ जॉब्स – एक सुवर्णसंधी

 

क्रूझवर नोकरी म्हणजे काय?

क्रूझ हे चालतं हॉटेलच समजा – ज्यात हजारो प्रवासी असतात, फाईव्ह स्टार सेवा दिली जाते आणि त्या सेवेच्या देखरेखीसाठी वेगवेगळ्या विभागांत अनुभवी स्टाफची गरज असते. हाऊसकीपिंग, फूड सर्विस, शेफ, बॅक ऑफिस, सिक्युरिटी, फिटनेस ट्रेनर, रिक्रिएशन ऑफिसर, आणि ब्यूटी/स्पा थेरपिस्ट अशा अनेक पदांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध असतात.

कुठल्या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते?

  • हॉटेल मॅनेजमेंट: सर्व्हिस, हाऊसकीपिंग, रिसेप्शन

  • कुकिंग/कुलिनरी आर्ट्स: शेफ, बेकरी, इंडियन-इंटरनॅशनल कुक

  • ट्रॅव्हल आणि टुरिझम: गेस्ट मॅनेजमेंट, इव्हेंट कोऑर्डिनेशन

  • ब्युटी/वेलनेस कोर्स: स्पा, मसाज, सलून सेवा

  • सिंपल ग्रॅज्युएट्स: जर इंग्रजी चांगली असेल तर काही बॅक ऑफिस किंवा स्टोअर विभागांमध्ये संधी

नोकरीसाठी पात्रता व तयारी:

क्रूझवर नोकरी मिळवण्यासाठी केवळ शिक्षण असून चालत नाही. खालील बाबींची तयारी असावी लागते:

  1. इंग्रजी भाषेचं चांगलं ज्ञान:
    – कारण गेस्ट्स वेगवेगळ्या देशांतून असतात. इंटरनॅशनल कम्युनिकेशन आवश्यक.

  2. प्रशिक्षण:
    – STCW (मरीन सेफ्टी कोर्स), INDOS, CDC (सीफेरर डॉक्युमेंट) हे आवश्यक.
    – हे कोर्सेस D.G. Shipping प्रमाणित संस्थांमधून करता येतात.

  3. इंटरव्ह्यू तयारी:
    – इंटरनॅशनल रिज्युमे, बॉडी लँग्वेज, व्हिडीओ इंटरव्ह्यूजसाठी सराव

  4. मेडिकल फिटनेस:
    – DG Shipping किंवा कंपनीच्या अधिकृत डॉक्टरकडून वैद्यकीय तपासणी

  5. व्हिसा आणि पासपोर्ट:
    – कंपनीनुसार अमेरिकन C1D किंवा शेंगेन व्हिसा आवश्यक असतो.

पगार किती असतो?

  • सुरुवातीला पगार $300 ते $800 (₹25,000 ते ₹70,000) पर्यंत असतो.

  • अनुभवी उमेदवारांना $1000 ते $2500 (₹85,000 ते ₹2 लाखापर्यंत) पगार मिळू शकतो.

  • फूड, राहण्याची व्यवस्था मोफत.

  • कर वाचतो, कारण पगार डॉलरमध्ये.

  • महत्त्वाचं म्हणजे एका वर्षात ६-७ देश फिरायची संधीही मिळते.

मोठा पगार हवा असेल तर काय करावं?

  • स्पेशल कोर्स – उदा. इंटरनॅशनल बेकरी, वाईन सर्विस, फायर अँड सेफ्टी, HACCP सर्टिफिकेशन

  • भाषा कौशल्य – इंग्रजीसोबत स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन, इटालियन यांची प्राथमिक ओळख

  • तांत्रिक ज्ञान – POS सिस्टम्स, इंटरनॅशनल F&B स्टँडर्ड्स

  • अनुभव – भारतात १-२ वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार प्राधान्याने निवडले जातात

विदेशी सफरीचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘क्रूझ’ जॉब्स – एक सुवर्णसंधी
विदेशी सफरीचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘क्रूझ’ जॉब्स – एक सुवर्णसंधी

क्रूझवर नोकरी मिळवण्यासाठी कुठे संपर्क करावा?

  • DG Shipping मान्यताप्राप्त मरीन प्रशिक्षण संस्था

  • नोकरीसाठी Cruise Line कंपन्यांच्या अधिकृत एजंट्स – Carnival, MSC, Royal Caribbean, Costa

  • reputed recruitment portals – Induscruise, Kamaxi, Airborne, CTI, Vships India

  • College campus placements (Hotel Management Colleges)

उद्योगातील वाढती मागणी

कोरोनानंतर पर्यटन क्षेत्र पुन्हा बूममध्ये आहे. हजारो नवीन क्रूझ शिप्स तयार होत आहेत. यामुळं पुढील ५ वर्षांत भारतातून दरवर्षी हजारो युवक क्रूझवर काम करण्यासाठी निवडले जाणार आहेत.
बांगलादेश, नेपाळ, फिलिपाइन्स, श्रीलंका या देशांमध्येही ही नोकरी लोकप्रिय आहे, मात्र भारतातील उमेदवार इंग्रजीत वर्तनकुशल असल्यामुळे अधिक मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *