इंजिनिअर किंवा डॉक्टर नाही? तरीही लाखोंची कमाई शक्य! जाणून घ्या हे ६ हटके करिअर पर्याय
“मोठेपणी काय व्हायचंय?” हा प्रश्न अनेकांच्या आयुष्यात विचारला जातो आणि उत्तर बहुतेक वेळा असतं – इंजिनिअर किंवा डॉक्टर. आजही या दोन्ही क्षेत्रांना प्रतिष्ठा आणि स्थिरता मिळते. मात्र काळानुसार करिअरच्या संधीही बदलल्या आहेत. आजच्या डिजिटल, इनोव्हेटिव्ह जगात अशा अनेक नवनवीन करिअर क्षेत्रांची गरज निर्माण झाली आहे, जिथे तुम्ही परंपरेबाहेर जाऊन काम करू शकता आणि उत्तम पगार मिळवू शकता.
खालील सहा पर्याय हे अशाच काही क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात, जे केवळ कौशल्यांवर आधारित आहेत आणि तुम्हाला यशस्वी आयुष्य देऊ शकतात.
1. मार्केटिंग मॅनेजर
कोणताही ब्रँड यशस्वी होण्यासाठी त्यामागे स्ट्रॉंग मार्केटिंग टीम असते. मार्केटिंग मॅनेजरचे काम म्हणजे ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यानुसार ब्रँड पोहोचवणे, कॅम्पेन तयार करणे, आणि विक्रीत वाढ करणे. क्रिएटिव्ह थिंकिंग आणि कम्युनिकेशन स्किल्स असलेल्यांसाठी हे क्षेत्र उत्तम आहे.
शैक्षणिक पात्रता – BBA/MBA (Marketing)
पगार – वार्षिक 5 ते 25 लाखांपर्यंत
2. प्रोडक्ट मॅनेजर
कोणतेही नवीन अॅप, वेबसाईट किंवा उत्पादन बाजारात आणण्यामागे असतो एक प्रोडक्ट मॅनेजर. हे व्यक्ती संपूर्ण डेव्हलपमेंट सायकलचे नेतृत्व करतात. बाजारातील ट्रेंड समजून, ग्राहकाच्या गरजांवर आधारित उत्पादन तयार करणे ही जबाबदारी त्यांची असते.
शैक्षणिक पात्रता – B.Tech, BBA, MBA, UX कोर्सेस
पगार – वार्षिक 6 ते 40 लाखांपर्यंत
3. इन्व्हेस्टमेंट बँकर
मोठ्या कॉर्पोरेट्स किंवा सरकारला भांडवल गोळा करायचं असल्यास इन्व्हेस्टमेंट बँकर्स त्यांना मदत करतात. हे क्षेत्र फायनान्स आणि शेअर बाजाराशी निगडित असून, उच्च बुद्धिमत्तेच्या आणि आर्थिक निर्णय क्षमतेच्या व्यक्तींसाठी योग्य आहे.
शैक्षणिक पात्रता – B.Com, Economics, MBA (Finance), CFA
पगार – वार्षिक 3 ते 45 लाखांपर्यंत
4. चार्टर्ड अकाउंटंट (CA)
व्यवसाय जगतातील सर्वात स्थिर आणि प्रतिष्ठेच्या प्रोफेशनपैकी एक म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट. टॅक्स प्लॅनिंग, ऑडिटिंग, फायनान्शियल रिपोर्टिंग ही मुख्य जबाबदारी. हा अभ्यासक्रम कठीण आहे, पण एकदा यशस्वी झाल्यास संधी भरपूर आहेत.
शैक्षणिक पात्रता – 12वी (Commerce) नंतर ICAI चा CA कोर्स
पगार – वार्षिक 3 ते 20 लाखांपर्यंत
5. कमर्शिअल पायलट
प्रवासाची आवड आणि टेक्निकल ट्रेनिंगची तयारी असेल, तर पायलट बनणे हे एक वेगळं आणि आकर्षक करिअर आहे. प्रवासी विमान, कार्गो विमान इत्यादीसाठी कमर्शिअल पायलट्सची मोठ्या प्रमाणावर गरज असते.
शैक्षणिक पात्रता – 12वी (Physics, Maths), CPL लायसन्स
पगार – वार्षिक 10 ते 80 लाखांपर्यंत
6. मॅनेजमेंट कन्सल्टंट
बिझनेस स्ट्रॅटेजी, ऑपरेशन्स किंवा प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी मोठ्या कंपन्या बाहेरच्या तज्ज्ञांचा सल्ला घेतात. या तज्ज्ञांना मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणतात. यात विविध उद्योगांची समज, डेटावर आधारित विचारसरणी आणि स्ट्रॅटेजिक थिंकिंग आवश्यक असते.
शैक्षणिक पात्रता – MBA (Strategy/Analytics)
पगार – वार्षिक 10 ते 45 लाखांपर्यंत